का वाढते वजन? Why Weight Gain?

Fitness Tips For Woman

कोरोनापासून लहान मुलांचा बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी कशी घ्यावी

पालक पुरी

Vaccination- बाळाला कोणती लस कधी द्यावी ?

Latest Posts

Calcium Deficiency- कॅल्शिअम ची कमतरता.

तिच जग..
Calcium Deficiency- कॅल्शिअम ची कमतरता. 

    तुम्हाला पूर्ण दिवस थकवा जाणवतो! कधी कधी शरीरातला एखादा भाग फार दुखू लागतो. याचा अर्थ असा आहे कि, तुमच्या शरीरात कॅल्शिअम ची मात्र कमी झाली आहे, आपल्या शरीरात अत्यावश्यक घटकांपैकी एक घटक म्हणजे कॅल्शिअम. कॅल्शिअममुळे  आपल्या दातांना व हाडांना मजबुती मिळते. जर  कॅल्शिअमची मात्र कमी झाली असेल तर आपल्याला त्रास जाणवतो. 
चला तर मग पाहुयात कॅल्शिअमच्या कमतरतेची कोणती आहेत लक्षणे- 
लक्षणे -
  • लवकर थकवा येणे. 
  • सतत हाडे दुखतात. सांधे दुखीचा त्रास होतो. 
  • नखे लवकर तुटतात. 
  • दात दुखतात. 
  • कॅल्शिअमच्या अभावामुळे केस खूप गळतात. 
  • हातापायांना मुंग्या येतात. 
  • ताणतणाव वाढतो आणि भीती वाटते. 
हि झाली काही सामान्य लक्षणे. कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे शरीराला अजून काही भोगावे लागते.यामध्ये त्या व्यक्तीला, १) अस्टियोपोरोसिस २) मेनोपॉज धोका वाढतो ३) कोलन कर्करोगच धोका वाढतो. ४) हृदयरोग धोका वाढतो, ५) रक्तदाब धोका वाढू शकतो. 

अशा प्रकारच्या भयानक त्रासापासून वाचण्यासाठी आपण आपल्या रोजच्या आहारात कॅल्शिअमयुक्त आहार घेऊन आपल्या शरीराला नक्की वाचवू शकतो. 


  • बिया (seeds)-    तीळ, ओवा, या अशा बियांचा वापर रोजच्या जेवणात करा. 
  • चीज ( Cheese )-    चीज हे दुधापासून बनवले असल्यामुळे त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असते. 
  • दूध- सर्वात जास्त फायदेशीर, सहज मिळणारा घटक म्हणजे दूध. दुधामध्ये भरपूर प्रमाणात कॅलसिम असते. शरीर ते लवकर पचवू शकते. दुधामध्ये व्हिटॅमिन D, A, प्रोटीन देखील असते. 
  • दही- दह्यापासून सुद्धा कॅल्शिअम मिळते, त्याचबरोबर phosphorus,potassium, व्हिटॅमिन B2 , B12 मिळते. 
  • मोड आलेली कडधान्ये आपल्या आहारात समाविष्ट करा. 
  • अंजिर, बदाम, गुळ, सोयाबीन नाचणी, आवळा यामध्ये सुद्धा कॅलसिम असते. 
  • हिरव्या  पालेभाज्यांचा जेवणात समावेश करा. 

यामधील जास्तीत जास्त घटकांचा समावेश तुमच्या आहारात करून तुमचे आरोग्य स्वस्थ व निरोगी ठेवा. 

 









श्रावणातील उपवासाचे पदार्थ- आप्पे

तिच जग..
श्रावणातील उपवासाचे पदार्थ- आप्पे 
श्रावण महिना म्हटलं कि उपवासाची रेलचेल सुरु होते. उपवासाचे पदार्थ बनवले जातात. त्याच्यात एकमेकांची नुसती चढाओढ लागते. प्रत्येक जण वेगळं काही तरी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. आज आपण असाच काहीसा उपवासाचा वेगळा पदार्थ म्हणजे 'उपवासाचे आप्पे ' कसे बनवायचे ते पाहुयात. 
उपवासाचे आप्पे
साहित्य-
  • अर्धा कप वरई 
  • १ कप भिजवलेले शाबू 
  • २ बटाटे 
  • ३ हिरव्या मिरच्या 
  • १ tsp बेकिंग सोडा 
  • कोथिंबीर 
  • २ tsp राजगिऱ्याचे पीठ. 
  • तेल 
  • चवीनुसार मीठ. 

कृती- 
  • शाबू रात्रीच भिजत ठेवावा म्हणजे चांगला भिजतो. 
  • मिक्सरच्या भांड्यातून शाबू, बटाटा,वरई ,हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, हे सगळं एकत्र करून चांगलं बारीक करून घ्या. 
  • त्यांनतर त्यामध्ये राजगिऱ्याचे पीठ, बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ, घालून पाण्याचा वापर करून बॅटर तयार करून घ्या. 
  • मग आप्पे पत्रामध्ये तेल लावून आपे करून घ्या. 
  • आप्पे दही किंवा चटणी सोबत खाऊ शकता. 
तुम्हाला आमची हि रेसिपी  कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. 









Ice Cake Recipe

तिच जग..
Ice Cake Recipe

साहित्य-
केक पावडर बनविण्यासाठी -
मैदा  -१५० ग्रॅम
साखर पावडर -७५ग्रॅम
दूध पावडर - ७५ ग्रॅम
बेकिंग पावडर -१/२ tsp
बेकिंग सोडा - १/२ tsp
व्हेनिला पावडर -१ tsp
Citric Acid- १/२ tsp

इतर साहित्य -
व्हिप. क्रीम- १५० ग्रॅम
Sugar syrup- ५ tsp
Pineapple flavour

सजावटी साठी साहित्य -
कलर जेल
मिक्स फ्रुट क्रश
चेरी/स्ट्रॉबेरी
रंगीत गोळ्या
कृती -
  • केक चा बेस बनविण्याचे सर्व साहित्य एकत्र करून घ्या.
  • त्या पावडरमध्ये गरजेनुसार पाणी घालून खूप पातळ पण नाही आणि फार घट्ट पण नाही असे मिश्रण बनवून घ्या. 
  • केक च्या भांड्याला थोड तेल लावून घ्या. थोडा मैदा लावून घ्या.
  • वरील मिश्रणामध्ये १tsp तेल घालून मिश्रण केक च्या भांड्यात ओता.
  • भांड पातेल्यात ठेवून मंद गॅसवर अर्धातास शिजवून घ्या.बेस गॅस वर पातेल्यात शिजवल्याने चांगला स्पंजी होतो.
  • बेस शिजल्यानंतर चांगला थंड करून घ्या.
  • बेस कटर ने गोल कापून त्याचे तीन काप करून घ्या.
  • प्रत्येक कापावर शुगर सिरप प्रत्येकी एक चमचा टाकून घ्यावे.
  • केकबेस थंड होईपर्यंत व्हिप क्रीम handblender ने चांगले फेटून घ्या.क्रीमला शाईन व घट्टपणा येईपर्यंत  फेटा.
  • बेस च्या प्रत्येक कापवर व्हीप क्रीम चांगले लावून घ्या.
  • बेस च्या बाजूनेसुद्धा क्रीम लावून घ्या.
  • क्रीम मध्ये फ्लेवर मिसळा.
  • चांगले फिनिशिंग करून घ्या.
  • व्हिप क्रीम नोझल च्या साहाय्याने कलर करून घेवून विविध सजावट करू शकता.
  • सजावटीसाठी gold/ silver गोळ्या वापरू शकता.



( टीप - तयार केक पावडर वापरली तरी चालेल)
कृपया, या रेसिपी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा.



Literature- 
To make cake powder -
 Flour - 150 gms 
Powdered sugar -75 gms 
Milk powder - 75 gms 
Baking powder -1 / 2 tsp 
Baking soda - 1/2 tsp
 Vanilla powder -1 tsp

Other materials - 
Whip. Cream - 150 gms 
Sugar syrup- 5 tsp
 Pineapple flavor 

Materials for decoration - 
Color gel, Mix Fruit Crush, Cherry / strawberry, Colored tablets
Action -
  • Combine all the ingredients to make a cake base. 
  • Add water as required to the powder and make a mixture that is neither too thin nor too thick. 
  • Grease the cake pan. 
  • Add a little flour.
  • Add 1 tsp oil to the above mixture and pour the mixture into the cake pan.
  • Put the pot in a pan and cook on low heat for half an hour. Cooking in a pan on base gas makes a good sponge.
  • After the base is cooked, cool well. 
  • Cut it into three rounds with the base cutter.
  •  Pour one teaspoon of sugar syrup on each cut.
  •  Wthe whipped cream with a handblender till the cake base cools down.
  • Apply the whip cream well on each slice of the base.
  • Apply the cream on the side of the base as well.
  •  Mix the flavors into the cream. 
  • Get a good finish. 
  • You can make various decorations by coloring with the help of whip cream nozzle.
  • You can use gold / silver tablets for decoration.






का वाढते वजन? Why weight gain?

तिच जग..
का वाढते वजन? (Scroll Down For English)
मी जास्त खात नाही तरी माझे वजन कसे वाढते? हा अनेक जणींचा प्रश्न आहे. वजन वाढण्यासाठी फक्त आपले खाणेच जबाबदार नाही तर आपल्या रोजच्या सवयी देखील कारणीभूत आहेत. चला तर मग, कोणत्या आहेत त्या सवयी ते आपण पाहुयात.
१) झोपण्याची पद्धत-
रात्री उशिरापर्यंत जागणे आणि सकाळी उशिरा उठणे , यामुळे कॅलरीझ बर्न ना होता फॅट्स अधिक वाढतात. दुपारची झोप घेण्यामुळे सुद्धा वजन वाढते. रोज रात्री ७-८ तासाची पूर्ण झोप घ्यावी. 
२) संतुलित आहार-
आहार संतुलित घ्या. वजन घटवणे म्हणजे चरबी कमी करणे. आहारात प्रोटिन्स, कार्बोहैड्रेट्स,आणि फॅट्स यांचा संतुलित समावेश हवाच.
३) व्यायामाचा अभाव-
व्यायाम नसल्यामुळे वजन जास्त वाढू शकते. दररोज व्यायाम हा हवाच. 
४) जेवण न करणे-
 खूप जण वजन कमी करण्यासाठी जेवण करतच नाहीत, हे खूप चुकीचे आहे. यामुळे शरीराचे नुकसान होते. जेवण व नाश्ता वेळोवेळी घ्या. खाण्यात अतिगोड आणि बाहेरचे पदार्थ कमी करा. जास्त फॅट्स असणारे पदार्थ टाळा. 
५) तणाव-
मानसिक व शारीरिक तणावामुळे देखील शरीरावर वाईट परिणाम होऊन वजन वाढू शकते.
६) औषधांचे सेवन- बऱ्याच प्रकारच्या औषधसेवनाच्या दुष्परिणामांमुळे वजन वाढते. यात स्त्री घेत असलेल्या कुटुंब नियोजनाच्या गोळ्यांचा देखील समावेश आहे. 
त्यामुळे नियमित व्यायाम करा, योग्य असा आहार घ्या आणि वजन कमी करण्यासाठी  तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

Why weight gain?
How do I gain weight even if I don't eat much?This is a question of many women.Weight gain is not only due to your eating but also to your daily habits.So let's see what those habits are.

1) Sleep pattern-
Waking up late at night and getting up late in the morning.This does not burn calories but increases fats. Getting a good night's sleep can also lead to weight gain. Get 7-8 hours of complete sleep every night.
2) Balanced diet-
Eat a balanced diet. Losing weight means losing fat. The diet should include a balanced supply of proteins, carbohydrates, and fats.
3) Lack of exercise-
Lack of exercise can lead to weight gain. Exercise is a must every day.
4) Not eating -
Too many people don’t even eat to lose weight, which is very wrong.This causes damage to the body. Eat meals and snacks from time to time. Eat less sweets and less outside.Avoid high fat foods.
5) Stress-
Mental and physical stress can also have a detrimental effect on the body and lead to weight gain.
6) Medication-
Weight gain due to many side effects of medication. It also includes the family planning pills the woman is taking.

So exercise regularly, eat right and consult your doctor to lose weight.



Fitness Tips For Woman I Fitness tips in Marathi

तिच जग..
Fitness Tips and Tricks:
    सध्या कोरोना व्हयरस मुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे आपल्याला रोजच्या या धकाधकीच्या जीवनापासून थोडा वेळ आहे तर हा वेळ आपल्यासाठी सत्कारणी लावू या. थोडं फिट राहुयात.त्यामुळे आपलं आरोग्यही उत्तम राहील. आणि प्रत्येक स्त्रीला आपण वाटत आपण सुंदर चिरतरुण दिसावं म्हणून या Fitness Tips.
    चला तर मग सहज सोप्या फिटनेस टिप्स घरच्या घरी पाहुयात. 
  • सर्वात महत्वाचे म्हणजे सकाळी लवकर उठा. 
  • व्यायामाचा प्रारंभ करायचा असेल तर चालण्याने करा.
  • व्यायामप्रकारात तुम्ही दोर उड्या मारा ,सायकलिंग करा. 
  • व्यायामामुळे शरीरावर ताण येणार नाही याची काळजी घ्या. 
  • सुरुवातीच्या काही दिवस १५ मिनिटे, नंतर हळूहळू वेळ वाढवत ती अर्धा तास किंवा १ तास अशी करा.
  • व्यायाम कसा करावा हे माहित नसेल तर त्यासाठी चांगली पुस्तके आणा किंवा त्याबद्दल चे ऍप्स डाउनलोड करा. 
  • योगासने,ध्यानधारणा करा त्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल. 
  • व्यायाम-योगासने करण्यासाठी योग्य असे कपडे वापरा. 
  • आणखी महत्वाचे म्हणजे योग्य आहार आणि पुरेशी झोप घ्या.  
  • नाश्ता आणि जेवनाच्या वेळा पाळा.
  • फिट राहण्यासाठी संतुलित आहारासोबत सकारात्मक विचारांची सुद्धा गरज आहे. 
  • आत्मविश्वास वाढावा.आत्मविश्वासामुळे तुमचे मन आणि शरीर दोन्ही निरोगी राहते. 
  • व्यसनाच्या आहारी जाऊ नका.
  •  भरपूर पाणी प्या त्याचा थेट प्रभाव तुमच्या त्वचेवर दिसतो. 
  • दिवसातून कमीत कमी एक तास स्वतःसाठी द्या. त्यामध्ये तुमचा छंद जोपासा. 
  • आहारात हिरव्या पालेभाज्या, सुका मेवा ,ताजी फळे घ्या. 
  • रोज एक ग्लास दूध प्या. 
  • काम करताना/ व्यायाम करताना आवडते Music ऐका. 
  • आजकाल महिलांचा आवडता व्यायामप्रकार आला आहे झुंबा डान्स (Zumba Dance ) तो देखील तुम्ही करू शकता. 
या काही फिटनेस टिप्स फक्त तिच्यासाठी... 


Pregnancy Depression- मातृत्वानंतर येणारं नैराश्य

तिच जग..
मातृत्वानंतर येणारं नैराश्य

"बाळा होऊ कशी उतराई 
तुझ्यामुळे मी झाले आई 
तुझ्या मुखाचे चुंबन घेता,
ह्रदयी भरते अमृत सरिता 
ताव संजीवन तुला पाजीता 
संगम होता उगम ठायी
गाई झुरू झुरू तुज अंगाई,
माय भुकेला तो जगजेगी 
तुझ्या स्वरूपी येऊनि पोटी 
मंत्र आई जपता ओठी 
महान मंगल देवाहून मी 
मातृ दैवत तुझेच होई. 
    
    
या अशा शब्दात आई तिला मातृत्व देणाऱ्या बाळाचे आभार मानते आणि ज्यांना हे सुख मिळत नाही त्या स्त्रिया तर्हे तर्हे चे प्रयत्न करीत असतात. 
        बाळाला जन्म देणे जेवढे अवघड तेवढच जास्त त्याला सांभाळणं अवघड. मुलांना सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत. मग ती गृहिणी असो वा करियर वुमन. घरकाम,ऑफिसचं काम आणि मुलांना सांभाळणं याचा समतोल साधताना, तिची दमछाक होते आणि मग याच अशा काही कारणामुळे बाळंतपणानंतर काही महिला नैराश्य किंवा आजाराशी झगडतात. मातृत्वानंतर येणारं नैराश्य हा काही नवीन आजार नाही पण आपल्या समाजात फारस लक्ष दिल जात नाही.घरात आलेले नवीन लहान मूळ याकडेच सगळे जण अधिक व्यस्त असतात. पण या आजाराकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. 
        योग्यवेळी काळजी घेऊन हा आजार दूर होऊ शकतो. कारण स्त्री हीच कुटुंबाचा मुख्य आधार असते.तीच कोलमडून कसे चालेल?
        आई होणं हे खरंच खूप सुंदर आहे. एक अविस्मरणीय अनुभव आहे. हे सगळं ठीक आहे. पण बाळाच्या जन्मानंतर सगळंच बदलून जाते. नवीन दिनक्रम, खाणं-पिणं बदलणं, झोप न मिळने, विश्रांती न मिळणे,या अशा गोष्टींमुळॆ  नैराश्येची लक्षणे दिसून येतात. काळाबरोबर हा आजाराचे गंभीर परिणाम दिसतात. 
लक्षणे- 
        लहान लहान गोष्टींची काळजी, कशात  मन न लागणे, उदास वाटणे, पूर्वी आवडणाऱ्या गोष्टी आता न आवडणे, छोट्या छोट्या कारणावरून रडायला येणे, हि काही नैराश्याची लक्षणे आहेत.  हा हार्मोन्स बदल, हे यामागचे प्रमुखकारण आहे. प्रस्तुतीनंतर काही शारीरिक आजार उद्भवल्यास नैराश्य येण्याची शक्यता आहे. आर्थिक प्रश्न,कुटुंबातील व्यक्तींचा कसलाच पाठिंबा नसणे, मुलगा-मुलगी  याबाबत असलेली इच्छा अपूर्ण राहणे, भांडणे या अशा कारणामुळे महिला नैराश्यात जातात. 
        कधीकधी बाळासाठी पुरेसे दूध उपलब्ध नसल्यामुळे आजूबाजूच्या महिला त्या स्त्रीला पाठबळ द्यायचं सोडून कमी लेखतात, त्यामुळे देखील नैराश्य येते. 
उपाय-
        यावरील उपाय म्हणजे त्या आईकडे तिच्या नवऱ्याने,आई वडील, सासू सासरे यांनी पुरेसे लक्ष देणे, तिला समजून घेणे, आणि पाठिंबा देणे गरजेचे असते. 
महत्वाचे- 
        काही मातांमध्ये जर नैराश्याचे प्रमाण जास्त असेल तर मानोसोपचारतज्ञ् यांचा सल्ला घेऊन वेळेत उपचार करणे गरजेचे ठरते.  अन्यथा त्याचे परिणाम बाळावर होण्याची शक्यता असते. 
         बाळंतपणानंतर आलेले नैराश्य या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये, वेळेतच याकडे लक्ष द्यावे. 
   

प्रेग्नंन्सी मधील आहार

तिच जग..
प्रेग्नंन्सी मधील  आहार- 
आई होणार या कल्पनेनेच ती स्त्री अगदी आनंदाने फुलून जाते, पण तिने हे विसरता कामा  नये कि तो गर्भ पूर्णपणे तिच्यावर अवलंबून आहे. तिच्या आहाराचा  तसेच आचार-विचाराचा परिणाम बाळावर होत असतो.म्हणून प्रत्येक गरोदर स्त्रीने समतोल आहार घेणे गरजेचे आहे. 
  • रोजच्या जेवनात पोळी/भाकरी ,भात,वरण , तूप, आमटी असावी. 
  • पालेभाज्या- मेथी,शेपू, करडई, आळू, शेवग्याची पाने,अगस्तीचा पाला, आंबटचुका, पानकोबी, राजगिऱ्याची भाजी,कोथिंबीर. 
  • डाळी- तूरडाळ,मुगडाळ,उडीद डाळ, मसूरडाळ. 
  • मोड आलेली कडधान्य- मटकी, मूग, हरभरा,वाटाणा. 
  • फळभाज्या- गवार,शेवगा, दोडका,वांगी, बटाटा,घोसावली,भोपळा. 
  • रोज २ ग्लास दूध प्यावे. 
  • मुळा, गाजर, बीट, टोमॅटो, काकडी कच्चे खाणे चांगले. 
  • फळे- पेरू,चिक्कू,केळी, सफरचंद,संत्री, मोसंबी.करवंद, बोर, आवळा, कवठ,रामफळ, सीताफळ. 
  • मटन,मासे, अंडी. 
    आहारात प्रथिने,पिष्टमय पदार्थ,जीवनसत्व,स्निग्ध पदार्थ,खनिजे ( प्रोटिन्स,व्हिटॅमिन्स,मिनरल्स इ. ) यांचा समावेश असावा. ताजे अन्न खावे.  दिवसातून ३-४ वेळा थोडे थोडे जेवावे. पोटभर जेवू नये, दोन घास कमी खावे. म्हणजे पचन चांगले होते. जेवणांनंतर लगेच पाणी पियू नये. दिवसभरात ३-४ लिटर पाणी प्यावे. 
        कोणताही आहार आनंदाने घ्यावा. 

मिक्स व्हेज कटलेट- Mix Veg Cutlet

तिच जग..
मिक्स व्हेज  कटलेट

भरपूर भाज्यांचे मिश्रण असणारी आणि तेवढीच पौष्टिक आणि चवीची रेसिपी- मिक्स व्हेज कटलेट
साहित्य- 
एक वाटी भिजवलेली हरभरा डाळ 
२५० ग्राम कोबी 
कांदा 
गाजर 
१०० ग्राम वाटाणा 
२०० ग्राम फ्लॉवर 
कोथिंबीर 
अर्धी वाटी मका (कॉर्न) 
हिरवी मिरची 
आलं लसूण पेस्ट 
गरम मसाला 
चाट मसाला 
हिंग 
लाल मिरची पावडर 
धने जिरे ओवा बडीशेप पावडर 
तेल 
मीठ 
सजावटीसाठी बारीक शेव, चीज 

कृती-
  • हरभरा डाळ रात्री बारीक भिजवावी व  सकाळी मिक्सर मधून थोडी जाडसर बारीक पेस्ट करून घ्यावी. 
  • तयार झालेल्या पेस्ट मध्ये बारीक चिरलेला कोबी टाकावा. 
  • नंतर फ्लॉवर  व वाटाणा (गरम पाण्यामधून थोडा वेळ उकळून घेतलेला )वरील मिश्रणामध्ये एकत्र करावा. 
  • नंतर बारीक चिरलेले गाजर, हिरवी मिरची,मका,बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर हे सर्व एकत्र करून घ्यावे. 
  • चिरलेल्या सर्व भाज्यांचे मिश्रण डाळीच्या पेस्ट मध्ये चांगले एकत्र करा. 
  • मिश्रण मध्ये १ tbs गरम मसाला, १ tbs चाट मसाला , अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, १चमचा धने जिरे ओवा बडीशेप पावडर, १ चमचा लाल मिरची पावडर टाकावी. 
  • हे सगळे मिश्रण चांगले एकत्र करून त्याचे घट्टसर मिश्रण करा. ( पाण्याची गरज लागत नाही)
  • त्याचे हवे त्या आकाराचे कटलेट बनवा. 
  • एका पॅन मध्ये १ tbsp तेल टाकून कटलेट shallow फ्राय करून घ्या. 
  • मिक्स व्हेज कटलेट तुम्ही पुदिन्याच्या चटणी सोबत खाऊ शकता. 
  • सजावटी साठी कटलेट वरती बारीक शेव, बारीक चिरलेली कोथिंबीर, व किसलेले चीज टाकू शकता. 
  • गरम गरम  कटलेट सर्व्ह  करा. 
तुम्हाला आमची हि रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. 






















पालक पुरी - Palak Puri

तिच जग..
पालक पुरी 

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वाना आवडेल अशी न्याहारीसाठीची डिश. 

साहित्य- 
  •  गव्हाचं पीठ - १००ग्रॅम 
  • पालक - अर्धा किलो(२ पेंडया)
  • आल लसूण पेस्ट १ चमचा 
  • गरम मसाला -१ चमचा 
  • लाल मिरची पावडर - १ चमचा 
  • चाट मसाला -१ चमचा 
  • धने जिरे ओवा बडीशेप पावडर -१ चमचा 
  • मीठ 
  • तेल- तळणेसाठी 
कृती-
  • पालक ची पाने धुवून घ्या. 
  • नंतर पालक ची पेस्ट बनवून घ्या. 
  • पेस्ट गव्हाच्या पीठामध्ये मिक्स करा. 
  • त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, धने-जिरे-ओवा-बडीशेप पावडर, गरम मसाला,चाट मसाला व चवीनुसार मीठ हे मिश्रण चांगले मिसळून घ्या. 
  • नंतर त्याची नरम कणिक मळून घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे बनवून त्याच्या पुऱ्या लाटा. 
  • कढईत तेल गरम करून पुऱ्या चांगल्या लालसर तळून घ्या. 
  • पुऱ्या सॉस,पुदिना चटणी,किंवा दही सोबत खाऊ शकता.  
तुम्हाला आमची हि डिश कशी वाटली ते नक्की कळवा.   












 

Malai Paneer Korma - मलाई पनीर कोरमा

तिच जग..


    मलाई पनीर कोरमा

 

 

साहित्य-

पाणी - ४ कप

कांदा (मध्यम) - 6 नग

आले - लहान तुकडा

लसूण पाकळ्या - 7-8 नग

हिरवी मिरची- २ 

काळी वेलची - १

शाही जीरा - 1 tsp

वेलची - 3

काजू - ½ कप

मिरपूड - ५-६ नग 

दही - 1 कप

तूप - 4 टेस्पून

दूध - 1 कप

हिरव्या मिरची( उभी अर्धी चिरलेली) - 1

आले चे लहान उभे काप

जवित्री पावडर - एक चिमूटभर

वेलची पूड - एक चिमूटभर

पनीर चौकोनी तुकडे - 2 कप

तेल  - 2 टेस्पून

मिरपूड - एक चिमूटभर

कृती-

  • ग्रेव्हीसाठी एक कढई घ्या आणि त्यामध्ये थोडे पाणी गरम करा. 
  • त्यामध्ये चिरलेला कांदा , लसूण, आले, हिरवी मिरची, शाही जीरा, हिरवी वेलची, काजू, मिरपूड हे नरम  होईपर्यंत उकळा
  • गॅस बंद करा, आणि एका भांड्यात मिश्रण गाळून घ्या.
  • राहिलेले पाणी टाकून द्या .
  • मिश्रण थंड करा आणि वेलची आणि हिरवी मिरची काढा
  • मिश्रण मिक्सर ग्राइंडरमध्ये ठेवा आणि पेस्ट बनवा
  • यात दही घाला आणि सगळे मिश्रण एकत्र मिक्स करा.
  • कढई गरम करून त्यात तूप घालावे.
  • तयार झालेली पेस्ट कढई मध्ये घ्या. 
  • झाकण ठेवून 10-12 मिनिटे शिजवा
  • ते मलईदार होण्यासाठी थोडेसे पाणी आणि क्रिमी दूध घाला
  • आता त्यात आले, हिरवी मिरची, जवित्री पावडर आणि वेलची पूड घाला
  • थोड्या वेळासाठी शिजवा आणि नंतर त्यात ताजे पनीर घाला आणि हलक्या हाताने ते मिश्रण हलवा. 
  • ५ मिनिटे शिजवा
  • गॅस बंद करा. करी तयार आहे
  • सजविण्यासाठी वरून थोडा रोगण आणि काळी मिरी टाका. 
आमची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. 












कोरोना आणि लहान मुलं

तिच जग..
कोरोना  आणि लहान मुलं

    अडगुलं मडगुलं 
    सोन्याचं कडगुलं 
    रुप्याचा वाळा 
    तान्ह्या बाळा 
    तीट टिळा 

    The well is round, round is the
        coconut tree trunk
    The gold bracelet is round 
        so is the silver anklet
    So is the black beauty spot 
         on my tender little baby's
                forehead.

        किती गोड शब्दात मांडल्या आहेत ना लहान मुलांबद्दल च्या भावना, कारण लहान मूलं तेवढीच गोड, निरागस असतात. नवजात बालकापासून ते १०-१२ वर्षाच्या मुलांपर्यंत प्रत्येकजण त्या मुलांची स्वच्छतेपासून- खाण्यापिण्यापर्यंत काळजी घेत असतात. पण आपल्याला आता जास्तीत जास्त काळजी घ्यावी लागत आहे. कारण जागतिक महामारी सध्या सुरु आहे. कोरोना सारखा महाभयंकर विषाणू आपल्या आजूबाजूला वावरत आहे. आत्ताच्या संशोधनानुसार १० वर्षाखालील  मुलांना त्याचा धोका जास्त आहे  कारण त्यांच्यात रोगप्रतिकार क्षमता कमी असते. 
        कोरोनापासून लहान मुलांचा बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी कशी घ्यावी, हे आपण पाहुयात. 
       कोरोना ची भीती नको काळजी घ्या.    

महत्वाचे- 
  • लहान मुलांना गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाणे टाळावे. 
  • एकमेकांच्यामध्ये १-२ फुटांचे अंतर ठेवा. 
  • साबणाने २० सेकंद हात स्वच्छ धुवा. वारंवार हात धुवा. 
  • सॅनिटायझर चा वापर करा. 
  • वारंवार चेहऱ्याला हात लावू नका. 
  •  कच्चे मांस खाणे टाळा. 
  • खोकताना आणि शिंकताना आपले तोंड आणि नाक झाकून घ्या. 
  • संसर्ग टाळण्यासाठी चांगले मास्क आणि हातमोजे वापरा. 
  • प्रवास टाळा. 
संतुलित आहार-
  •  ताजी फळे खायला देणे. 
  • रोजच्या आहारात पालेभाज्यांचा समावेश करा. 
  • सर्व पदार्थ गरम व ताजे देणे. 
  • सूप,सार, पातळ पदार्थांचा वापर करा. 
  • आसपासच्या जवळच्या ठिकाणी शुद्ध हवेत फिरायला नेणे. 
  • सकाळच्या कोवळ्या उन्हात उभे करणे. 
  • पुरेशी झोप घेणे. 
  • कोमट पाणी पिणे. 
आयुर्वेदिक काढा- 
साहित्य:-  
    काढ्याच्या प्रमाणात चार भाग तुळशीची पाने. 
     गवती चहा. 
    १इंच आलं. 
    १ छोटा चमचा हळद 
    २ भाग दालचिनी 
    २ भाग सुंठ 
    १ भाग काळे मिरे 
    १ भाग वेलची 
    १ भाग लवंग 
    जायफळ 
    १छोटा चमचा मध/गुळ 
    चिमूटभर मीठ 
कृती-
     दालचिनी ,सुंठ, काळे मिरे, वेलची, लवंग, जायफळ यांची पावडर करून घ्यावी. 
    १५० मिली पाण्यात तुळस, गवती चहा, चिमूटभर मीठ टाकून ते उकळण्यासाठी ठेवा. नंतर पाण्यामध्ये तयार केलेली पावडर टाका. 
    हे सर्व १० मिनिटे उकळून द्यावे. पाण्याची पातळी अर्धी होईपर्यंत आटून द्यावे.
    नंतर काढा गाळणीने गाळून घ्यावा. 
    गरम गरम काढ्यात मध किंवा गुळ  टाका. काढा गरम आहे तोपर्यंत प्यावा.तरच त्याचा फायचा होईल. 
    काढा पिल्यांनतर एक तास तरी काही खाऊ-पिउ  नये. 


हळदीचे दूध- 
        साहित्य-
         दुध, पाणी, हळद, साखर
  कृती-  
   अर्धा कप पाण्यात अर्धा कप दूध आणि चिमूटभर हळद घालून उकळवा. दुधामध्ये हळद पावडर पेक्षा हळकुंड वापरल्यास उत्तम. नंतर ते दुध मंद आचेवर १५-२० मी. ठेवा. थोडी साखर घातली तरी चालेल. दूध गरम गरम च प्यायला द्यावे. 


        या आणि अशाच काही छोट्या छोट्या गोष्टींपासून लहान मुलांचा आणि आपला बचाव करू शकतो. 
    















Chicken Dum Biryani. चिकन दम बिर्याणी

तिच जग..
                     चिकन दम बिर्याणी 

            नाव घेताच तोंडाला पाणी सुटणारी ही रेसिपी अगदी हॉटेल सारखी, कशी करायची ते पाहू. 

साहित्य- 
        *चिकन मॅरिनेशन - २५०ग्रॅम चिकन                             
                                        १ टेबलस्पून आलं- लसूण पेस्ट  
                                        अर्धा टेबलस्पून हळद पावडर 
                                        मीठ         
                                        धने,जिरे
                                        खडा मसाला (पावडर सगळे)               
                                        १ चमचा लिंबू पाणी 
                                        अर्धा चमचा दही 
                                        १ चमचा तांबडं तिखट 
                                        १ चमचा बिर्याणी मसाला 
                                        १ चमचा  कोथिंबीर पेस्ट /पावडर 
                                        २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या 
                                        १ टेबलस्पून पुदिना 
                                        १ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर 
                                        १ टेबलस्पून तळलेला कांदा
                                        तेल 


   * बासमती राईस (भात) - २५०- ३०० ग्रॅम                                     
                                       ५ कप पाणी 
                                      ३-४ तमालपत्र
                                      ८-१० काली मिरी 
                                      ३ हिरव्या , २ काळी वेलची 
                                      अर्धा चमचा शाही काळे जिरे             
                                      २ दालचिनी 
                                      मीठ 
                                      १ चमचा तूप 
                                      लिंबू 

* layering बिर्याणी५-६ चमचे तूप 
                                  १ चमचा बिर्याणी मसाला 
                                  १ टेबलस्पून तळलेला कांदा 
                                  ७-८ केशर 
                                  कोथिंबीर 
                                  पुदिना 
                                  तळलेला ब्राउन कांदा भरपूर 

१) चिकन मॅरिनेशन साठी - 
       * प्रथम चिकन धुवून घ्या. 
       * चिकन मध्ये आलं लसूणपेस्ट, हळद, मीठ, लिंबू टाका. 
       * ते सर्व व्यवस्थित मिक्स करा आणि १०ते १५ मिनिट बाजूला ठेवा. 
       * त्यामध्ये  नंतर दही, तांबडं तिखट बिर्याणी मसाला ,कोथिंबीर, मीठ, धने जिरे पावडर टाकून एकत्र करा
       * नंतर त्यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, पुदिना ,सर्व खडा मसाला पावडर टाका. थोडे तेल टाका. 
       * सर्व एकत्र करून १ तासासाठी मॅरीनेट करण्यासाठी झाकून ठेवा.  


२) भात - 
        * पाणी उकळून घ्या . 
        * त्यामध्ये तमालपत्र, काळीमिरी, काली आणि हिरवी वेलची, शाही जिरे, दालचिनी आणि मीठ टाका. 
 हे सर्व मिश्रण पाण्यामध्ये टाका. 
        * तांदूळ धुवून घ्या 
        * पाण्यामध्ये तांदूळ टाका. त्यामध्ये ७०-८०% तूप टाका. लिंबू पिळा . 
        * ७-८ मिनीट भात शिजवून घ्या. 
        * तांदूळ अर्धा कच्चा शिजवून घ्या. 

३) Layering बिर्याणी - ( थराची बिर्याणी )

        * प्रथम एक पातेले घ्या. 
        * त्या पातेल्याला आतून सर्व बाजूनी तूप लावून घ्या. 
        * प्रथम मॅरिनेटेड चिकन चा थर लावा.  
        * नंतर थोडा भात, नंतर थोडा तळलेला ब्राउन कांदा टाका. 
        * नंतर थोडा अजून भात , नंतर  बिर्याणी मसाला पसरवून टाका. 
        * नंतर थोडे केशर टाका.त्यामध्ये कोथिंबीर- पुदिना बारीक चिरून टाका. 
        * नंतर अजून थोडा राहिलेला भात टाका, २-३ चमचे पाणी टाका . 
        * पातेल्यावरती झाकण ठेवा. झाकण कणकीने पूर्ण बंद करा.
        * बारीक गॅस वरती एक तास बिर्याणी शिजू द्या. 
        * गॅसवरती तवा ठेवून त्यावरती पातेले ठेवले तरी चालेल. 
        * एका तासानंतर गॅस बंद करा.  
        * बिर्याणी थंड होऊद्यात . 
        * पातेल्याचे झाकण काढून त्याला पातेल्याच्या आतमध्ये बिर्याणीला  कोळसे गरम-लाल करून धुरी देऊ शकता . त्यामुळे एक वेगळा  छान वास बिर्याणीला येईल. धुरी देऊन पातेले झाकून ठेवा. 
        * सर्व थर एकत्र करा. 
        * तुमची बिर्याणी तयार.        
                                                                                     
       

तुम्हाला आमची हि रेसिपि कशी वाटली ते आम्हाला कळवा. 










Our Team

  • TejaswiniBlogger
  • RanveerBlogger