मलाई पनीर कोरमा
साहित्य-
पाणी - ४ कप
कांदा (मध्यम) - 6 नग
आले - लहान तुकडा
लसूण पाकळ्या -
7-8 नग
हिरवी मिरची- २
काळी वेलची - १
शाही जीरा - 1 tsp
वेलची - 3
काजू - ½ कप
मिरपूड - ५-६ नग
दही - 1 कप
तूप - 4 टेस्पून
दूध - 1 कप
हिरव्या मिरची( उभी अर्धी चिरलेली) - 1
आले चे लहान उभे काप
जवित्री पावडर
- एक चिमूटभर
वेलची पूड - एक चिमूटभर
पनीर चौकोनी तुकडे
- 2 कप
तेल - 2 टेस्पून
मिरपूड - एक चिमूटभर
कृती-
- ग्रेव्हीसाठी एक कढई घ्या आणि त्यामध्ये थोडे पाणी गरम करा.
- त्यामध्ये चिरलेला कांदा , लसूण, आले, हिरवी मिरची, शाही जीरा, हिरवी वेलची, काजू, मिरपूड हे नरम होईपर्यंत उकळा.
- गॅस बंद करा, आणि एका भांड्यात मिश्रण गाळून घ्या.
- राहिलेले पाणी टाकून द्या .
- मिश्रण थंड करा आणि वेलची आणि हिरवी मिरची काढा.
- मिश्रण मिक्सर ग्राइंडरमध्ये ठेवा आणि पेस्ट बनवा.
- यात दही घाला आणि सगळे मिश्रण एकत्र मिक्स करा.
- कढई गरम करून त्यात तूप घालावे.
- तयार झालेली पेस्ट कढई मध्ये घ्या.
- झाकण ठेवून 10-12 मिनिटे शिजवा.
- ते मलईदार होण्यासाठी थोडेसे पाणी आणि क्रिमी दूध घाला.
- आता त्यात आले, हिरवी मिरची, जवित्री पावडर आणि वेलची पूड घाला.
- थोड्या वेळासाठी शिजवा आणि नंतर त्यात ताजे पनीर घाला आणि हलक्या हाताने ते मिश्रण हलवा.
- ५ मिनिटे शिजवा.
- गॅस बंद करा. करी तयार आहे.
- सजविण्यासाठी वरून थोडा रोगण आणि काळी मिरी टाका.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा
आपला अभिप्राय लिहा.