भरपूर भाज्यांचे मिश्रण असणारी आणि तेवढीच पौष्टिक आणि चवीची रेसिपी- मिक्स व्हेज कटलेट.
साहित्य-
एक वाटी भिजवलेली हरभरा डाळ
२५० ग्राम कोबी
कांदा
गाजर
१०० ग्राम वाटाणा
२०० ग्राम फ्लॉवर
कोथिंबीर
अर्धी वाटी मका (कॉर्न)
हिरवी मिरची
आलं लसूण पेस्ट
गरम मसाला
चाट मसाला
हिंग
लाल मिरची पावडर
धने जिरे ओवा बडीशेप पावडर
तेल
मीठ
सजावटीसाठी बारीक शेव, चीज
कृती-
- हरभरा डाळ रात्री बारीक भिजवावी व सकाळी मिक्सर मधून थोडी जाडसर बारीक पेस्ट करून घ्यावी.
- तयार झालेल्या पेस्ट मध्ये बारीक चिरलेला कोबी टाकावा.
- नंतर फ्लॉवर व वाटाणा (गरम पाण्यामधून थोडा वेळ उकळून घेतलेला )वरील मिश्रणामध्ये एकत्र करावा.
- नंतर बारीक चिरलेले गाजर, हिरवी मिरची,मका,बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर हे सर्व एकत्र करून घ्यावे.
- चिरलेल्या सर्व भाज्यांचे मिश्रण डाळीच्या पेस्ट मध्ये चांगले एकत्र करा.
- मिश्रण मध्ये १ tbs गरम मसाला, १ tbs चाट मसाला , अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, १चमचा धने जिरे ओवा बडीशेप पावडर, १ चमचा लाल मिरची पावडर टाकावी.
- हे सगळे मिश्रण चांगले एकत्र करून त्याचे घट्टसर मिश्रण करा. ( पाण्याची गरज लागत नाही)
- त्याचे हवे त्या आकाराचे कटलेट बनवा.
- एका पॅन मध्ये १ tbsp तेल टाकून कटलेट shallow फ्राय करून घ्या.
- मिक्स व्हेज कटलेट तुम्ही पुदिन्याच्या चटणी सोबत खाऊ शकता.
- सजावटी साठी कटलेट वरती बारीक शेव, बारीक चिरलेली कोथिंबीर, व किसलेले चीज टाकू शकता.
- गरम गरम कटलेट सर्व्ह करा.
तुम्हाला आमची हि रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा
आपला अभिप्राय लिहा.