Pregnancy Depression- मातृत्वानंतर येणारं नैराश्य

मातृत्वानंतर येणारं नैराश्य

"बाळा होऊ कशी उतराई 
तुझ्यामुळे मी झाले आई 
तुझ्या मुखाचे चुंबन घेता,
ह्रदयी भरते अमृत सरिता 
ताव संजीवन तुला पाजीता 
संगम होता उगम ठायी
गाई झुरू झुरू तुज अंगाई,
माय भुकेला तो जगजेगी 
तुझ्या स्वरूपी येऊनि पोटी 
मंत्र आई जपता ओठी 
महान मंगल देवाहून मी 
मातृ दैवत तुझेच होई. 
    
    
या अशा शब्दात आई तिला मातृत्व देणाऱ्या बाळाचे आभार मानते आणि ज्यांना हे सुख मिळत नाही त्या स्त्रिया तर्हे तर्हे चे प्रयत्न करीत असतात. 
        बाळाला जन्म देणे जेवढे अवघड तेवढच जास्त त्याला सांभाळणं अवघड. मुलांना सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत. मग ती गृहिणी असो वा करियर वुमन. घरकाम,ऑफिसचं काम आणि मुलांना सांभाळणं याचा समतोल साधताना, तिची दमछाक होते आणि मग याच अशा काही कारणामुळे बाळंतपणानंतर काही महिला नैराश्य किंवा आजाराशी झगडतात. मातृत्वानंतर येणारं नैराश्य हा काही नवीन आजार नाही पण आपल्या समाजात फारस लक्ष दिल जात नाही.घरात आलेले नवीन लहान मूळ याकडेच सगळे जण अधिक व्यस्त असतात. पण या आजाराकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. 
        योग्यवेळी काळजी घेऊन हा आजार दूर होऊ शकतो. कारण स्त्री हीच कुटुंबाचा मुख्य आधार असते.तीच कोलमडून कसे चालेल?
        आई होणं हे खरंच खूप सुंदर आहे. एक अविस्मरणीय अनुभव आहे. हे सगळं ठीक आहे. पण बाळाच्या जन्मानंतर सगळंच बदलून जाते. नवीन दिनक्रम, खाणं-पिणं बदलणं, झोप न मिळने, विश्रांती न मिळणे,या अशा गोष्टींमुळॆ  नैराश्येची लक्षणे दिसून येतात. काळाबरोबर हा आजाराचे गंभीर परिणाम दिसतात. 
लक्षणे- 
        लहान लहान गोष्टींची काळजी, कशात  मन न लागणे, उदास वाटणे, पूर्वी आवडणाऱ्या गोष्टी आता न आवडणे, छोट्या छोट्या कारणावरून रडायला येणे, हि काही नैराश्याची लक्षणे आहेत.  हा हार्मोन्स बदल, हे यामागचे प्रमुखकारण आहे. प्रस्तुतीनंतर काही शारीरिक आजार उद्भवल्यास नैराश्य येण्याची शक्यता आहे. आर्थिक प्रश्न,कुटुंबातील व्यक्तींचा कसलाच पाठिंबा नसणे, मुलगा-मुलगी  याबाबत असलेली इच्छा अपूर्ण राहणे, भांडणे या अशा कारणामुळे महिला नैराश्यात जातात. 
        कधीकधी बाळासाठी पुरेसे दूध उपलब्ध नसल्यामुळे आजूबाजूच्या महिला त्या स्त्रीला पाठबळ द्यायचं सोडून कमी लेखतात, त्यामुळे देखील नैराश्य येते. 
उपाय-
        यावरील उपाय म्हणजे त्या आईकडे तिच्या नवऱ्याने,आई वडील, सासू सासरे यांनी पुरेसे लक्ष देणे, तिला समजून घेणे, आणि पाठिंबा देणे गरजेचे असते. 
महत्वाचे- 
        काही मातांमध्ये जर नैराश्याचे प्रमाण जास्त असेल तर मानोसोपचारतज्ञ् यांचा सल्ला घेऊन वेळेत उपचार करणे गरजेचे ठरते.  अन्यथा त्याचे परिणाम बाळावर होण्याची शक्यता असते. 
         बाळंतपणानंतर आलेले नैराश्य या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये, वेळेतच याकडे लक्ष द्यावे. 
   

तिच जग..

Author & Editor

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

आपला अभिप्राय लिहा.