प्रेग्नंट आहे हे कसे ओळखावे? How to identify about pregnancy?

प्रेग्नंट आहे हे कसे ओळखावे? How to identify about pregnancy?

        'आई' होणं ही खरंच खुप सुंदर कल्पना आहे,एक अविस्मरणीय अनुभव आहे. एका स्त्री चा नवीन जन्मच. तीच संपूर्ण जग बदलून जात,तिचं खाणंपिणं ,राहणीमान, वागणे-बोलणे,अगदी स्वभाव पण बदलून जातो. आणि तीच जग एका गोष्टीवर गुरफटू लागत,ज्या जीवाला तिने अजून डोळ्यांनी पाहिलेलं पण नसतं , हाताने स्पर्शपण केलेला नसतो.  
        काय जादू असतेना!ती फक्त त्या चिमुकल्या जीवाचा विचार करत असते.जे काय करत असते फक्त ते त्यासाठीच. जे आवडते ते पण खाते आणि जे आवडत नाही ते त्याच्या आरोग्यासाठी, चांगल्या वाढीसाठी खाते.   
        पण, आता तिने आपण आई होणार आहोत हे कसे ओळखाव?   

          
 लक्षणे -
१) मासिक पाळी -
                पाळी न येणे, हे प्रमुख कारण की ,तुम्ही प्रेग्नंट आहे हे ओळखू  शकता .पण आजकालच्या धकाधकीच्या  जीवनात पाळी  खूप जणींना न येणे अथवा वेळेवर  न येणे या समस्या आहेत. त्यामुळे याबाबत गैरसमज होतो आणि आपण गरोदर आहे असे तिला वाटू लागते.     



    
 २) उलटी होणे आणि मळमळणे -
                    सकाळी उठल्या उठल्या उलटी होणे आणि मळमळणे या सारख्या समस्या जाणवल्यास तुम्ही गरोदर आहात;परंतु काही महिलांमध्येच  अशी लक्षणे दिसून येतात, बऱ्याच महिलांना प्रेग्नंसी दरम्यान उलट्या होत नाहीत. 
                                    


३) वारंवार लघवीला जावं लागणे- 
                    प्रेग्नंसी मध्ये वारंवार लघवीला जावं लागण, हि एक समस्या जाणवते. 

४) पोट फुगणे किंवा पोटात दुखणे- 
                    हार्मोन्स बदलामुळे गर्भावस्थेत पोट फुगणे हि समस्या जाणवते. गरोदरपनाच्या सुरुवातीला प्रोजेस्टेरॉनची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते, त्यामुळे शरीरामध्ये मोठे बदल होतात परिणामी अस्वस्थता , गॅस  धरणे हे जेवण झाल्यांनतर जाणवते. 
५) मूड बदलणे आणि चिडचिडेपणा-
                     भावनिक चढउतार होऊ लागतात. अचानक राग येणे, हसू येणे, मधूनच मन उदास होणे, जास्त आनंद होणे .  हे सर्व हार्मोन्स बदलामुळे जाणवते. 
६)   थकवा आणि अशक्तपणा -
                       तिच्या शरीरामध्ये बाळाला आश्रय देण्यासाठी तीच शरीर स्वतःला तयार करत असते.त्यामुळे थकवा जाणवणे हि साधारण गोष्ट आहे. 
                                                
७) शरीराचं तापमान वाढणे- 
                     गरोदरपानात शरीराचे तापमान नेहमी पेक्षा वाढते, अंग थोडे गरम लागते तरी समजावे आपण गरोदर आहोत. 
८) बद्धकोष्टता आणि छातीत जळजळणे -
                     तिच्या शरीरामध्ये होणाऱ्या बदलाचा परिणाम पचनक्रियेवरही होतो. पोटात गॅस धरणे हि समस्या नऊ महिने देखील राहू शकते . पचनक्रियेत बदलामुळे छातीत जळजळ जाणवते. 
९) स्तनामध्ये बदल - 
                    गर्भावस्थेमध्ये हार्मोन्स मुळे  स्तनामध्ये रक्तप्रवाह वाढतो त्यामुळे स्तनाचे टोक गडद काळ्या रंगाची होतात स्तनामध्ये जडपणा जाणवतो. 
१०) वारंवार डोकेदुखी-
                    गरोदरपनामध्ये सुरुवातीच्या काळात डोकेदुखी जाणवते, पण नंतर बरी होते. 
११) डोहाळे - 
                    विशिष्ट खास गोष्टी खाण्याची खूप इच्छा होणे म्हणजे डोहाळे लागणे. ती तेच खाते जे तिला खावस वाटत. हा एक स्त्रीच्या आयुष्यातील खूप गोड़ अनुभव आहे. ती तिचे सगळे हट्ट पूर्ण करून घेऊ  शकते. 

                                                

१२) व्हाईट डिस्चार्ज - 
                    युरीन  इन्फेक्शन पासून बचावासाठी अत्याधिक प्रमाणात व्हाईट डिस्चार्ज होतो, हे देखील हार्मोन्स मुळेच होते. पण हा बदल चांगल्यासाठीच होतो. 
१३) तीव्र वास -
                    गर्भावस्थेत अगदी दूरचा  वास देखील सहज ओळखला जाऊ शकतो. 

ही झाली लक्षणे. 
                

आता तुम्ही गरोदर(प्रेग्नंट) आहात, याची खात्री कशी करायची ते पाहू:

१) Pregnancy  Kit -
                आपणास शक्य असल्यास बाजारमध्ये ( मेडिकल) pregnancy kit  मिळते ते आणून तुम्ही खात्री करू शकता. यामध्ये यूरिन टेस्ट केली जाते. शकतो सकाळी उठल्या उठल्या हि टेस्ट करावी म्हणजे त्याचा 
 रिजल्ट चांगला येतो.                                                                     

    
        
      
२) डॉक्टरकडे जावे-
                           डॉक्टरकडे जाऊन तुम्ही  खात्रीशीर टेस्ट करून घेऊ शकता. डॉक्टर ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट, ultrasonography च्या माध्यमातून तुम्हाला तुम्ही प्रेग्नंन्ट आहेत का किंवा तुम्हाला कितवा महिना आणि गर्भ कसा आहे,हे सांगू शकतात. 
                                            
                    

                    अशा काही गोष्टीतून तुम्ही गरोदर आहात का हे माहित करून घेऊ शकता आणि  एका विलक्षण अनुभवासाठी तुम्ही सज्ज व्हाल. 
                            तुला मातृत्वाच्या  शुभेच्छा!!!













तिच जग..

Author & Editor

1 टिप्पणी(ण्या):

आपला अभिप्राय लिहा.