श्रावण महिना म्हटलं कि उपवासाची रेलचेल सुरु होते. उपवासाचे पदार्थ बनवले जातात. त्याच्यात एकमेकांची नुसती चढाओढ लागते. प्रत्येक जण वेगळं काही तरी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. आज आपण असाच काहीसा उपवासाचा वेगळा पदार्थ म्हणजे 'उपवासाचे आप्पे ' कसे बनवायचे ते पाहुयात.
साहित्य-
- अर्धा कप वरई
- १ कप भिजवलेले शाबू
- २ बटाटे
- ३ हिरव्या मिरच्या
- १ tsp बेकिंग सोडा
- कोथिंबीर
- २ tsp राजगिऱ्याचे पीठ.
- तेल
- चवीनुसार मीठ.
कृती-
- शाबू रात्रीच भिजत ठेवावा म्हणजे चांगला भिजतो.
- मिक्सरच्या भांड्यातून शाबू, बटाटा,वरई ,हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, हे सगळं एकत्र करून चांगलं बारीक करून घ्या.
- त्यांनतर त्यामध्ये राजगिऱ्याचे पीठ, बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ, घालून पाण्याचा वापर करून बॅटर तयार करून घ्या.
- मग आप्पे पत्रामध्ये तेल लावून आपे करून घ्या.
- आप्पे दही किंवा चटणी सोबत खाऊ शकता.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा
आपला अभिप्राय लिहा.