तुम्हाला पूर्ण दिवस थकवा जाणवतो! कधी कधी शरीरातला एखादा भाग फार दुखू लागतो. याचा अर्थ असा आहे कि, तुमच्या शरीरात कॅल्शिअम ची मात्र कमी झाली आहे, आपल्या शरीरात अत्यावश्यक घटकांपैकी एक घटक म्हणजे कॅल्शिअम. कॅल्शिअममुळे आपल्या दातांना व हाडांना मजबुती मिळते. जर कॅल्शिअमची मात्र कमी झाली असेल तर आपल्याला त्रास जाणवतो.
चला तर मग पाहुयात कॅल्शिअमच्या कमतरतेची कोणती आहेत लक्षणे-
लक्षणे -
- लवकर थकवा येणे.
- सतत हाडे दुखतात. सांधे दुखीचा त्रास होतो.
- नखे लवकर तुटतात.
- दात दुखतात.
- कॅल्शिअमच्या अभावामुळे केस खूप गळतात.
- हातापायांना मुंग्या येतात.
- ताणतणाव वाढतो आणि भीती वाटते.
हि झाली काही सामान्य लक्षणे. कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे शरीराला अजून काही भोगावे लागते.यामध्ये त्या व्यक्तीला, १) अस्टियोपोरोसिस २) मेनोपॉज धोका वाढतो ३) कोलन कर्करोगच धोका वाढतो. ४) हृदयरोग धोका वाढतो, ५) रक्तदाब धोका वाढू शकतो.
अशा प्रकारच्या भयानक त्रासापासून वाचण्यासाठी आपण आपल्या रोजच्या आहारात कॅल्शिअमयुक्त आहार घेऊन आपल्या शरीराला नक्की वाचवू शकतो.
- बिया (seeds)- तीळ, ओवा, या अशा बियांचा वापर रोजच्या जेवणात करा.
- चीज ( Cheese )- चीज हे दुधापासून बनवले असल्यामुळे त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असते.
- दूध- सर्वात जास्त फायदेशीर, सहज मिळणारा घटक म्हणजे दूध. दुधामध्ये भरपूर प्रमाणात कॅलसिम असते. शरीर ते लवकर पचवू शकते. दुधामध्ये व्हिटॅमिन D, A, प्रोटीन देखील असते.
- दही- दह्यापासून सुद्धा कॅल्शिअम मिळते, त्याचबरोबर phosphorus,potassium, व्हिटॅमिन B2 , B12 मिळते.
- मोड आलेली कडधान्ये आपल्या आहारात समाविष्ट करा.
- अंजिर, बदाम, गुळ, सोयाबीन नाचणी, आवळा यामध्ये सुद्धा कॅलसिम असते.
- हिरव्या पालेभाज्यांचा जेवणात समावेश करा.
यामधील जास्तीत जास्त घटकांचा समावेश तुमच्या आहारात करून तुमचे आरोग्य स्वस्थ व निरोगी ठेवा.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा
आपला अभिप्राय लिहा.