नाव घेताच तोंडाला पाणी सुटणारी ही रेसिपी अगदी हॉटेल सारखी, कशी करायची ते पाहू.
साहित्य-
*चिकन मॅरिनेशन - २५०ग्रॅम चिकन
१ टेबलस्पून आलं- लसूण पेस्ट
अर्धा टेबलस्पून हळद पावडर
मीठ
धने,जिरे
खडा मसाला (पावडर सगळे)
१ चमचा लिंबू पाणी
अर्धा चमचा दही
१ चमचा तांबडं तिखट
१ चमचा बिर्याणी मसाला
१ चमचा कोथिंबीर पेस्ट /पावडर
२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
१ टेबलस्पून पुदिना
१ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
१ टेबलस्पून तळलेला कांदा
तेल
* बासमती राईस (भात) - २५०- ३०० ग्रॅम
५ कप पाणी
३-४ तमालपत्र
८-१० काली मिरी
३ हिरव्या , २ काळी वेलची
अर्धा चमचा शाही काळे जिरे
२ दालचिनी
मीठ
१ चमचा तूप
लिंबू
* layering बिर्याणी - ५-६ चमचे तूप
१ चमचा बिर्याणी मसाला
१ टेबलस्पून तळलेला कांदा
७-८ केशर
कोथिंबीर
पुदिना
तळलेला ब्राउन कांदा भरपूर
१) चिकन मॅरिनेशन साठी -
* प्रथम चिकन धुवून घ्या.
* चिकन मध्ये आलं लसूणपेस्ट, हळद, मीठ, लिंबू टाका.
* ते सर्व व्यवस्थित मिक्स करा आणि १०ते १५ मिनिट बाजूला ठेवा.
* त्यामध्ये नंतर दही, तांबडं तिखट बिर्याणी मसाला ,कोथिंबीर, मीठ, धने जिरे पावडर टाकून एकत्र करा
* नंतर त्यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, पुदिना ,सर्व खडा मसाला पावडर टाका. थोडे तेल टाका.
* सर्व एकत्र करून १ तासासाठी मॅरीनेट करण्यासाठी झाकून ठेवा.
२) भात -
* पाणी उकळून घ्या .
* त्यामध्ये तमालपत्र, काळीमिरी, काली आणि हिरवी वेलची, शाही जिरे, दालचिनी आणि मीठ टाका.
हे सर्व मिश्रण पाण्यामध्ये टाका.
* तांदूळ धुवून घ्या
* पाण्यामध्ये तांदूळ टाका. त्यामध्ये ७०-८०% तूप टाका. लिंबू पिळा .
* ७-८ मिनीट भात शिजवून घ्या.
* तांदूळ अर्धा कच्चा शिजवून घ्या.
३) Layering बिर्याणी - ( थराची बिर्याणी )
* प्रथम एक पातेले घ्या.
* त्या पातेल्याला आतून सर्व बाजूनी तूप लावून घ्या.
* प्रथम मॅरिनेटेड चिकन चा थर लावा.
* नंतर थोडा भात, नंतर थोडा तळलेला ब्राउन कांदा टाका.
* नंतर थोडा अजून भात , नंतर बिर्याणी मसाला पसरवून टाका.
* नंतर थोडे केशर टाका.त्यामध्ये कोथिंबीर- पुदिना बारीक चिरून टाका.
* नंतर अजून थोडा राहिलेला भात टाका, २-३ चमचे पाणी टाका .
* पातेल्यावरती झाकण ठेवा. झाकण कणकीने पूर्ण बंद करा.
* बारीक गॅस वरती एक तास बिर्याणी शिजू द्या.
* गॅसवरती तवा ठेवून त्यावरती पातेले ठेवले तरी चालेल.
* एका तासानंतर गॅस बंद करा.
* बिर्याणी थंड होऊद्यात .
* पातेल्याचे झाकण काढून त्याला पातेल्याच्या आतमध्ये बिर्याणीला कोळसे गरम-लाल करून धुरी देऊ शकता . त्यामुळे एक वेगळा छान वास बिर्याणीला येईल. धुरी देऊन पातेले झाकून ठेवा.
* सर्व थर एकत्र करा.
* तुमची बिर्याणी तयार.
तुम्हाला आमची हि रेसिपि कशी वाटली ते आम्हाला कळवा.
Nice
उत्तर द्याहटवा