साहित्य-
- गव्हाचं पीठ - १००ग्रॅम
- पालक - अर्धा किलो(२ पेंडया)
- आल लसूण पेस्ट १ चमचा
- गरम मसाला -१ चमचा
- लाल मिरची पावडर - १ चमचा
- चाट मसाला -१ चमचा
- धने जिरे ओवा बडीशेप पावडर -१ चमचा
- मीठ
- तेल- तळणेसाठी
कृती-
- पालक ची पाने धुवून घ्या.
- नंतर पालक ची पेस्ट बनवून घ्या.
- पेस्ट गव्हाच्या पीठामध्ये मिक्स करा.
- त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, धने-जिरे-ओवा-बडीशेप पावडर, गरम मसाला,चाट मसाला व चवीनुसार मीठ हे मिश्रण चांगले मिसळून घ्या.
- नंतर त्याची नरम कणिक मळून घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे बनवून त्याच्या पुऱ्या लाटा.
- कढईत तेल गरम करून पुऱ्या चांगल्या लालसर तळून घ्या.
- पुऱ्या सॉस,पुदिना चटणी,किंवा दही सोबत खाऊ शकता.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा
आपला अभिप्राय लिहा.