प्रेग्नंन्सी मधील आहार-
आई होणार या कल्पनेनेच ती स्त्री अगदी आनंदाने फुलून जाते, पण तिने हे विसरता कामा नये कि तो गर्भ पूर्णपणे तिच्यावर अवलंबून आहे. तिच्या आहाराचा तसेच आचार-विचाराचा परिणाम बाळावर होत असतो.म्हणून प्रत्येक गरोदर स्त्रीने समतोल आहार घेणे गरजेचे आहे.
- रोजच्या जेवनात पोळी/भाकरी ,भात,वरण , तूप, आमटी असावी.
- पालेभाज्या- मेथी,शेपू, करडई, आळू, शेवग्याची पाने,अगस्तीचा पाला, आंबटचुका, पानकोबी, राजगिऱ्याची भाजी,कोथिंबीर.
- डाळी- तूरडाळ,मुगडाळ,उडीद डाळ, मसूरडाळ.
- मोड आलेली कडधान्य- मटकी, मूग, हरभरा,वाटाणा.
- फळभाज्या- गवार,शेवगा, दोडका,वांगी, बटाटा,घोसावली,भोपळा.
- रोज २ ग्लास दूध प्यावे.
- मुळा, गाजर, बीट, टोमॅटो, काकडी कच्चे खाणे चांगले.
- फळे- पेरू,चिक्कू,केळी, सफरचंद,संत्री, मोसंबी.करवंद, बोर, आवळा, कवठ,रामफळ, सीताफळ.
- मटन,मासे, अंडी.
आहारात प्रथिने,पिष्टमय पदार्थ,जीवनसत्व,स्निग्ध पदार्थ,खनिजे ( प्रोटिन्स,व्हिटॅमिन्स,मिनरल्स इ. ) यांचा समावेश असावा. ताजे अन्न खावे. दिवसातून ३-४ वेळा थोडे थोडे जेवावे. पोटभर जेवू नये, दोन घास कमी खावे. म्हणजे पचन चांगले होते. जेवणांनंतर लगेच पाणी पियू नये. दिवसभरात ३-४ लिटर पाणी प्यावे.
कोणताही आहार आनंदाने घ्यावा.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा
आपला अभिप्राय लिहा.